WCE days वर लिहुयाच अशी एक सुप्त आकांक्षा नेहमीच मनात होती.पण तिला व्यव स्थितपणे मुर्त रुप देणं काही शक्य झालं नाही..कारण खर पाहता इथल वातावरण आपण काही फार अनुभवलय अस मला वाटत नाही..पण त्याविषयी लिहिणं एक वेगळी धुंदी देत हे नक्की..पुन्हा एकदा हे सर्व दिवस जगल्यासारख वाटतं..त्यामुळे लिखाणात फार प्रगल्भता, सर्वंकषता आणि पुरेपुरपणा कदाचित असणार नाही..शेवटी लिखाण हे लेेेखकाच्या perspective नेच जग दाखवतं असतं..आणि जर जगात काही absolute नाहीये, तर मग ते आपले विचार आणि अनुभवही याला अपवाद कसे असणार !...मला WCE जशी जाणवली,दिसली,वाटली ते तसं थोडं उतरवन्याचा हा एक छोटासा प्रयत्न... आणखी काय बोलावे..आपले अगत्य असु द्यावे ही विद्यापना... लेखनसीमा |
Posts
Showing posts from October, 2017
- Get link
- X
- Other Apps
यांत्रिक अभियांत्रिकी(😊)द्वितीय वर्ष ✌..... 12:30 ला bell झाली आणि MPMT चा पेपर सुद्धा (कसाबसा😅)पार पडला (किंवा पार पाडला म्हणा😛).ESE EXAM झाली या Excitement मधे यावेळी सरांनी पेपर हिसकावून घ्यायच्या आधीच मीच त्यांच्या हातात दिला...हुश्श करून बाहेर आलो..पेपर बद्दल थोडं बोलत असतानाच कोणीतरी म्हणाल;संपल sem एकदाचं.😅(actually environment हा विषय खरच छान असला तरी आपल्या बिघडलेल्या अणि बदललेल्या environment मुळे आपण त्याला Existence मध्येच धरत नाही बहुतेक)..ते ऐकून मीहि आनंदाने मान डोलावली...पण sem संपली या शब्दाचा अर्थ व्यवस्थितपणे माझ्या subconscious mind मधे पोहचुन मला current लागायला 2-3 मिनिटे लागली.. आणि मग त्याच विचारात गेल्या जवळ जवळ साडेचार महिन्यांच्या कालावधीत काय कमावल आणि काय गमावलं याचा लेखाजोखा करताना जे काही वाटलं ते कदाचित थोड उपरोधिकपणे वा गंभीरपणे मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न... काय कमावलं या यादीत VERTEX,MIND Spark(सांगली ते पुणे केलेला अविस्मरणीय प्रवास), Working ...