Posts

Showing posts from November, 2017
                   सकाळी सकाळी 8 वाजता शिवम् च्या हाकेने जाग आली.अगदी डोळे चोळत,वाईट चेहरा करून उठलो.याला लवकर उठायची सवय लागली कधी असा विचार करतानाच, नवीन कॉलेज मधे असल्याची जाणीव झाली.                   पांघरूण कडेला सारलं (ते व्यवस्थित घडी घालून ठेवण्याची सवय तर आजही नाही) आणि मरगळ झटकून वसतिगृहाच्या व्हरांड्यात आलो.दुसऱ्या  मजल्यावरून सगळं कसं अगदी मस्त वाटत होतं.मुक्त!!.समोर मुलींंच्या वसतिगृहाच्या पटांगणात  लावलेली झाडे,अगदी बगिच्यासारखी केलेली एकूणच  सजावट  दिसत   होती , लांबवर सांगली-मिरज रोड वरील वाहने वेगात धावताना  दिसत होती.आजपासून  आयुष्यात  काहीतरी नवीन चालू होणार या कल्पनेनंच बरं वाटत होतं.                   राउटर बघून वायफाय कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला.पण फर्स्ट इयर होस्टेल राउटर अजून बंदच होते.मुलांची सकाळची आन्हिके उरकायची धावपळ दिसली आणि मी भानावर आलो. ...