Posts

Showing posts from February, 2018

पै पाव्हणे

               संध्याकाळचे साडेपाच झाले.कॉलेजमधून रूमवर आलो.बॅग खुर्चीत टाकली.                सकाळपासून चार तास लेेेक्चर्स आणि दोन तासांचं अनाकलनीय व अद्भुत असं thermodynamics च  प्रॅक्टिकल सहन केल्यामुळे अथक परिश्रम केल्याच्या अविर्भावात बेड वर पाठ टेकवली. दुपारी कॉलेजनंतर मिळणाऱ्या त्या राजेशाही झोपेचा आनंद काय वर्णावा !!एखादा झोपेबद्दल अरसिक असणारा विद्यार्थीच त्या आनंदास मुुकत असावा. (मुळात असा विद्यार्थी कोणी नसेलच, आणि असलाच तरी तो इंजिनीरिंगचा विद्यार्थी असेल काय हा खचितच वादाचा मुद्दा होईल.)                जग जिंकल्याच्या अविर्भावात डोळे मिटले, तोच;.....बऱ्याचदा आपल्या झोपेचं खोबरं करणारं, खिशात मावनारं , तासाला वर्गातच नेमकं वाजणारं, कंटाळवाण्या लेक्चरला हळूच बाहेर काढलं तरी शिक्षकांना लगेचं दिसणारं ते छोटंसं मोबाईल नामक उपकरण जिवाच्या आकांताने वाजलं .              झोपेचं भरीत झालं.चेहरा अत्यंत वाईट करून मी फो...