यांत्रिक अभियांत्रिकी(😊)द्वितीय वर्ष ✌..... 

12:30 ला bell झाली आणि MPMT चा पेपर सुद्धा (कसाबसा😅)पार पडला (किंवा पार पाडला म्हणा😛).ESE EXAM झाली या Excitement मधे यावेळी सरांनी पेपर हिसकावून घ्यायच्या आधीच मीच त्यांच्या हातात दिला...हुश्श करून बाहेर आलो..पेपर बद्दल थोडं बोलत असतानाच कोणीतरी म्हणाल;संपल sem एकदाचं.😅(actually environment हा विषय खरच छान असला तरी आपल्या बिघडलेल्या अणि बदललेल्या environment मुळे आपण त्याला Existence मध्येच धरत नाही बहुतेक)..ते ऐकून मीहि आनंदाने मान डोलावली...पण sem संपली या शब्दाचा अर्थ व्यवस्थितपणे माझ्या subconscious mind मधे पोहचुन  मला current लागायला 2-3 मिनिटे लागली.. आणि मग त्याच विचारात गेल्या जवळ जवळ साडेचार महिन्यांच्या कालावधीत काय कमावल आणि काय गमावलं याचा लेखाजोखा करताना जे काही वाटलं ते कदाचित थोड उपरोधिकपणे वा गंभीरपणे मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न...
              काय कमावलं या यादीत VERTEX,MIND Spark(सांगली ते पुणे केलेला अविस्मरणीय प्रवास), Working Models(AT),SUPRA planning आणि त्यातुन झालेला Go-Cart चा उदय,काही club activities,कमावलेलं (चिमुटभर)Technical Knowledge अस बरच काही येते.. 
          पण काय गमावलं या यादीत पहिला क्रमांक Submissions चा येतो. (त्यासाठी पेन,रिफिल, store मधुन कागदांचा घेतलेला प्रचंड मोठा गठ्ठा,फाइल etc.हे तर गेलच ,पण त्यात नेमक काय लिहिलय याकडे ढूंकुनहि न पाहणाऱ्या गुरुजनांमुळे extra रद्दी झालेली आहे ती आहेच)दुसर काय गमावलं असेल तर अजुन व्यवस्थित Technical Knowledge मिळवण्याची चांगली संधि..
          सुरुवातीला अभ्यास ,working models,येणारा stress अणि strain,होणारे आमचेच dislocatins यांच्याशी जुळवुन घेताना या महायुद्धात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या आमच्या branch change आणि DA साथीदारांची आम्ही थोडी अतुरतेनेच वाट पाहिली(प्रांजळपणे कबुलिजवाब ).पण ते आल्यानंतर त्यांना बघुन ,त्यांची संख्या बघुन आणि त्याचं प्रचंड technical knowledge बघुन आम्हा प्रचंड आशावादी मानसांची निराशाच झाली...आणि sem मधील बरेच अंदाज चुकन्याची सुरुवात झाली...

Comments

pravin said…
ek number lihil ahes...All the best bro..keep going on..
Unknown said…
Sem 3 che 'kahi vishay' durach thevles shubhya..😜.. Chan lihilays pn..! Ajun kahi athvani share kelyas tr vachayla nakki aavdel..!
Shubham Kumbhar said…
Thanks bro..!! Achanak te"Vishay"nako mhatal😉..halu halu prayatna Karen ajun lihinyacha !!
Shubham Kumbhar said…
Thanks for all the support bro !!...
Mayur Kharade said…
कंस जास्त झालेत. सुरुवातीला थोडं अवघड वाटतंय. पण छान लिहिलंयस इंजिनीअरिंगच एक वेगळं विश्व आहे. यावर सविस्तर लिही..����
Shubham Kumbhar said…
नक्कीच प्रयत्न करेन !!😊
Amey Kumbhar said…
Awsm💞 Brodaa....Well Done....
Eagerly waiting for your next writing 😎😇....

Popular posts from this blog

आमचे सर....