"मेरी बातें है, सब बातें तुम्हारी...मेरा अपना कोई किस्सा नही",असं फरहत शहजाद यांच्या शायरीमधलं एक वाक्य आहे.झाकीर खानचा Amazon prime चा Haq se single चा episode बघितला असेल तर सुरुवातीलाच ते वाक्य येतं.
            ते वाक्य खरं मला दोन अर्थाने भावतं; एक,माझं बोलणं अथवा माझं लिखाण हे खरं तर तुमच्याच आयुष्यातल्या विषयांंवर आहे, यात माझी काही कहाणी नाही आणि दुसरा, हे लिखाण हे खरं तर तुमच्याकडूनच मिळालेलं देेणं आहे.हे विषय ,हे अनुुुभव हे तुमच्यामुुुळेच आहेत.त्यात माझा काही किस्सा, मोठेपणा नाही...WCE Days लिहिताना याहून माझी नक्कीच वेगळी भावना नाही..
             इथे जे काही आहे ते थोडं फार मिळेल त्या आयामांनी अनुभवणे आणि त्यातून काही ना काही शिकत राहणे हीच मुळात फार आनंददायी प्रक्रिया आहे..
            मला वाटतं, अगदी शेजारी बसलेल्या बेंच पार्टनरशी जनरल चर्चा करताना हे शिकणं चालू होतं...Teaching वा non teaching faculties लेक्चरमधे, प्रॅक्टिकलमधे, ट्युटोरीयलमधे तर कधीकधी जाताजाता काहीतरी टेक्निकल गोष्टी शिकवून जातात.विविध इव्हेंट्स,स्पर्धा काहीतरी स्वनिर्मितीचा,नवीन केल्याचा आनंद देण्याबरोबरच Design, Manufacturing aspects शिकवून जातात..
              हे झालं इंजिनीरिंग वा टेक्निकल गोष्टी शिकण्याबद्दल..पण वर्गाबाहेरच्या जगात अगदी क्षणाक्षणाला काहिनाकाही नॉन टेक्निकल शिकायला मिळत असतं.आपण गोष्टी बघत असतो, त्यावर विचार करत असतो, त्याविषयी बोलत असतो,कधी भांडत असतो,कधी त्यावर कृृती करतो, कधी यशस्वी होतो तर कधी प्रयत्नांतच फसतो,
मग परत उभं राहतो,परत नवीन काहीतरी...
हे चालूच असतं आपलं..
कोणीतरी म्हटलंयसुद्धा "Engineering is more about how to deal with the world than Technical stuff"
वालचंदही नक्कीच अपवाद नाही याला..
आपले डोळे आणि कान सताड उघडे ठेवले आणि थोडं डोकं शाबूत ठेवलं तर आपण स्वीकारायला कमी पडू इतकं वालचंद देतं आपल्याला.
           बर ते शिक्षणही एक अर्थाने एकतर्फी नाही..ती "WIN - WIN " कंंडिशन आहे...आणि म्हणूनच आनंददायी आहे.त्यामुळे WCE Days...ही गोष्टच मुळी सर्वांची आहे.वालचंदकडे बघत, जे काही थोडंफार पदरात पडेल ते घेत, सर्वांचे अनुभव घेत तयार होणारी आहे..
त्यामुळे या ज्या काही थोड्याफार 
गप्पा आहेत..त्या तुम्हांसर्वांमुळे आहेत..
आणि त्यामुळे तो कृतज्ञता भाव नेेहमीच राहतो.
आणि लेखणी उचलली की लक्षात येतं...
"मेरी बातें है, सब बातें तुम्हारी...मेरा अपना कोई किस्सा नही"

Comments

Popular posts from this blog

आमचे सर....