आमचे सर....
"हजार दिवस कसून अभ्यास करण्यापेक्षा आदर्श शिक्षकासोबत एक दिवस घालवणे अधिक श्रेयस्कर आहे ." -जपानी सुभाषित . वालचंद मधे मेकॅनिकल इंजिनिरिंगला प्रवेश घेतला आणि खरं सांगायचं तर प्रथम वर्षीच काही खास शिक्षक आणि त्यांचं खास शिकवणं पाहून आपल्या आयुष्यातील उत्तम ज्ञानार्जनाचा सुवर्णकाळ आता लोपला कि काय याची मला दाट शंका येऊ लागली. मात्र बऱ्याच गोष्टींची सुतराम शक्यताही वाटत नसताना त्या अचानक खऱ्या करून धक्के देण्याचं सामर्थ्य वालचंदच्या हवेत आहे हे नक्की... शिक्षकांच्या शिकविण्याच्या विविध पद्धतीआणि विभिन्न स्वभाव इतर महाविद्यालयांसारखे इथेही पाहायला मिळतात पण अगदी त्यातही मला इथे जास्तच विविधता आढळली. त्या अर्थानं वालचंदचं शिक्षण हे बहुरंगी आहे. इथं दुसऱ्या शिक्षकांचं लेक्चर घेऊन अवचित ISE घेणारे,चालू रुटीन अकॅडेमिक्स मधे बऱ्याचदा रेग्युलर लेक्चर न घेता वीकएंडला जादा लेक्चर घेणा...